Sunday, 16 December 2018

मनुवाद्यांच्या गळाला कोण कोण लागणार?

मनुवाद्यांच्या गळाला कोण कोण अडकणार?
- मनोज काळे, ठाणे.
महाराष्ट्रात २०१४ ला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणे सुरु होते, पुर्ण निकाल जाहीर झालेले नव्हते, भाजपा चा विजययी उमेदवारांचा आकडा ८० च्या पुढे गेला व राष्ट्रवादी कॉंग्रेस कडुन प्रफुल पटेलांनी जाहीर केले की भाजपा सरकार स्थापन करणार असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा चा बिनशर्त पाठींबा असेल.
शिवसेना व भाजपा यांनी स्वतंत्र निवडणूका लढवुन एकमेकांची शक्ती तपासुन पाहीली होती, भाजपाने सेनेला मागे टाकले होते,पन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला कोणाचातरी पाठींबा लागणार होता, राष्ट्रवादीने बिनशर्त पाठींबा जाहीर केल्याने शिवसेनेला भाजपवर जास्त दबाव बनवने शक्य झाले नाही तरीही हिंदुत्वाच्या समान तत्वावर त्यांनी युती केली पण अनेकदा मिळालेली दुय्यम वागणुक, अपमान सहन करुन शिवसेनेला सरकार मध्ये टिकावे लागले, त्यांनी सत्तेबाहेर पडुन सरकार पाडण्याचा विचार केला असता तर बिनशर्त पाठींबा वाले बाहेर तयारच बसलेले होते त्यामुळे भिडे एकबोटे व मनुवादी सरकार अजुनही तग धरुन आहे.
त्यानंतर १ जानेवारी २०१८ ला भीडे एकबोटे च्या समर्थकांकडुन निशस्त्र व सहकुटुंब आलेली आंबेडकरी जनता व लहान ओबीसी, आलुतेदार व बलुतेदार यांच्यावर हल्ला केला गेला, अनेकांना जबर मारहान झाली, गाड्यांचे नुकसान झाले,  एक निश्पाप जिवही गेला.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यावेळी समाजासाठी धावुन आले, त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या दंगलीच्या सुत्रधाराला ताबडतोब नावासह एक्सपोज केले, हल्लेखोर कोन आहेत त्यांची नावे जाहीर झाले, त्याच वेळी महाराष्ट्रातील एक जबाबदार व वरीष्ठ नेते शरद पवार यांनी कधी नव्हे एखाद्या घटनेवर त्यांनी झटपट स्वताचे मत व्यक्त करुन सांगितले की “या हल्यामागे पुण्याजवळचे हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे“,  या विधानामुळे हिंदु विरुद्ध बौद्ध असा वाद होऊ शकला असता मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी जनतेला शांततेचे अवाहन करत मुख्य सुत्रधार व संघटनांची नावेच जाहीर करुन टाकले व एक दिवसाचा महाराष्ट्र बंद घोषित केला.
महाराष्ट्र बंद ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, राज्याचा कानाकोपरा कडकडीत बंद राहीला, व राज्यात वादंग माजवण्याचा मनुवादी डाव वाया गेला.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी भीडे व एकबोटे या जातीवादी दंगलखोरांच्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याचे जनतेचा लक्षात आणुन दिले.
"शरद पवारांनी स्वतःचे राजकीय चारित्र्य तपासुन पहावे" असा सल्लाही बाळासाहेबांनी दिली, पवारांनी आगोदर हिंदुत्ववादी संघटनां वर ताषेरे ओढुन पाहीले पन त्यांना काही राजकीय फायदा होत नसल्याचे त्यांना जाणवले, बाळासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी २०१८ ला मुंबईत जाहीर केले की यापुढे कोणत्याही निवडणूकात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस शी युती किंवा सहकार्य करणार नाही, कारण त्यांचा गृहमंत्री असताना भीडे सारखा हाफिज सैय्यद ला त्यांनी अभय दिले होते व एक आतंकवादी पोसण्याचे काम त्यांनी केले होते, मिरज दंगलीत पोलिस अधिक्षक कृष्णप्रसाद यांनी भिडे ला तुरुंगात घालण्याची पुर्ण तयारी तेली होती पण राष्ट्रवादीने भिडे ला अभय दिले होते, खैरलांजी हत्याकांडानंतर जे जन आंदोलन झाले त्यातील आंदोलकांना नक्सलवादी चा शिक्का मारणारेही राष्ट्रवादीचे गृहमंत्रीच होते, पवारांनी केलेला आंबेडकरी चळवळीचा सत्यानाश सर्वांनाच माहीती आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रवादीला एक्सपोज केले व त्यांना त्यांचे राजकीय चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले.
इतके सगळे होऊनही काही संविधान तज्ञ समजले जाणारे आंबे़करी नेतृत्वाचा आव आणनारे नेते त्यांच्या गळाला लागले व भंडारा निवडणूकीत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदिवासी उमेदवारा विरुद्ध तो उमेदवार दिला ज्याच्या आजोबाने १९५२ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूकीत हरवले होते, आम्ही बाबासाहेबांच्या पराजयाचा बदला घ्यायला पहात होते पन तथाकथीत स्वयंघोषित संविधान तज्ञ मात्र पवाराच्या इशार्यावर आंबेडकरी जनतेची जुन्या जखमेवरची खपली काढत होते. पवारांना नवा दास सापडला आहे अशी महाराष्ट्रात चर्चाही झाली.
आठवले गटाच्या वर्धापन दिनाला आर एस एस चे फडणवीस प्रमुख पाहुने आले व सुरेश माने च्या कार्यक्रमाला भूजबळ प्रमुख पाहुने जे भीडे एकबोटे ला एक दिवस आधी क्लिन चिट देणार्या पवाराचे हस्तक आहेत हे सगळ्यांना माहीत आहेच.
पन भुजबळांना व सुरेश मानेंना बाळासाहेबांच्या विरुद्ध वापरायचे असेल तर त्यांची भीडे समर्थक ही ओळख पुसली पाहीजे याचाच भाग की काय माहीत नाही पन त्याच दिवशी भुजबळांना एक निनावी पत्र आले व ते पत्र भीडे समर्थकाने लिहीले आहे व त्यात भुजबळांचा पानसरे करु अशी धमकी दिली आहे.
मी म्हणत नाही की ते पत्र खोटे आहे पन त्यांनीही ते पत्र खरे आहे असा दावा करु नये. त्याची चौकशी व्हावी. पन सध्या जगात पत्र पाठवुन कोणी धमकावत असेल यावर किती लोक विश्वास ठेवतील?
पत्रांचे आणखी दोन तीन ताजे किस्से पहा
१. हेच छगन भुजबळ जेल मध्ये असताना शरद पवारांनी जेलर ला पत्र लिहीले म्हणुन बाहेर सोडले गेले असा प्रचार झाला होता.
२. मोक्का अंतर्गत जेलमध्ये असलेले चंद्रशेखर रावन च्या आईने जेलर ला पत्र लिहीले व त्यालाही जेल मधुन सोडले असे ऐकले
३. नक्सलवाद्यांनीही पत्रे लिहीली व राजीव गांधी स्टाईलने देशात नेत्यांची हत्या करु असे पत्र सापडले अशा आरोपाखाली काही लोकांना पकडले गेले.
४. भुजबळांना कुणीतरी जीवे मारायची धमकीही आता पत्राद्वारे दिली गेली.
मैने प्यार किया च्या काळा नंतर आतात असा पत्र व्यवहार पुन्हा चर्चेच आला आहे, जनता सुज्ञ आहे, राजकारण समजु शकते.
जनता आता प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडायला शिकली आहे त्यामुळे जुने डावपेच आता काम करणार नाहीत हे या नेत्यांना कळत नसेल का?
बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेले मनुस्मृती, संविधान बचावो, मोदी हटावो, राफेल, बेटी बचावो हेच मुद्दे कॉपी मारुन चाणक्य स्वताचे राजकारण करु पहात आहेत ज्यावर जनता हसताना दिसत आहे.
यांचे राजकीय चारित्र्य तपासायचे असेल तर सध्याचे सुरु असलेले मुद्दे पहा
1.पवार साहेब स्वतः मोदीचे समर्थन करतात, सुप्रिया ताई संविधान बचावो म्हणुन मनुस्मृती जाळतात हे काय भानगड आहे? एकाने भाजप ला खुष करायचे व एकाने भाजप विरोधकांना पकडायला पहायचे.
2.मोदी पवारांना गुरु मानतात, पवार मोदींना राफेल बद्दल क्लिन चिट देतात, तारिक अन्वर सारखा नेता पक्षाला सोडुन जातो, सुप्रिया ताई मात्र राफेल बद्दल मोदीला दोष लावतात.
3.शरद पवार ज्यांनी स्वता जाहीर केले होतेकी हिंदुत्ववादी संघटना नी भीमा कोरेगावचा हल्ला केला ते परवा म्हणाले की तो हल्ला कोणत्याच संघटनेने केला नव्हता, व त्याच दिवशी भुजबळांना एक निनावी पत्रही आले.
याच गलिच्छ राजकारणाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक्सपोज केले आहे पण काही महत्वाकांक्षी व सत्तेचे लालची लोक ज्यांनी त्या सत्तेच्या लालचा साठी स्वतःचा पक्ष, विचारधारा यांच्याशी गद्दारी केली तेच पवारांच्या ताटाखाली मांजर बनुन बसतात व साहेब काहीतरी तुकडा फेका अशी विनवनी करतात, इतकी वर्ष रामदास ला पुर्ण वापरला, तो आता संपत आहे तर दुसरा दास आपोआप या गळाला जाऊन अडकला आहे,
सोबत काही रत्नाकर गायकवाड ची पिलावळेही त्यांना जाऊन मिळालेली आहेत, त्यांना सत्ता मिळेल की नाही माहीत नाही पन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा हा झंझावात थांबवण्यासाठी हे बांडगुळ वैर्याच्या दारावर लाचारी पत्करुन बसलेत हे जनतेने लक्षात घ्यावे. आंबेडकरां विरुद्ध कोणाला वापरायचे हे आता मनुवादी लोकांनी ठरवले आहे, ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल, राष्ट्रवादी चे नेते व रत्नाकर गायकवाड चे चेले कोणत्या नेत्याला समर्थन करुन आंबेडकरांविरुद्ध वापरतीत हे निट लक्ष देऊन पहा,त्यांना मतपेटीतुन उत्तर द्या.
आज धनगर,मराठा,मातंग,भटके विमुक्त, आदिवासी, चर्मकार,मुस्लिम, आलुतेदार बलुतेदार एकत्र येऊन मनुवादाशी टक्कर देत असताना या वंचिता विरुद्ध विकाऊ, दलाल स्वयंघोषित आंबेडकरी नेते, सत्ता व पद पैशासाठी हपापलेले बांडगुळे गोळा करुन आपल्याच विरुद्ध त्यांना उभे केले जात आहे, जनतेने आता त्यांना विरोध न करता मतपेटीतुन त्यांची जागा दाखवुन दिली पाहीजे.
*भिडे समर्थकांचे राजकीय पक्ष ( भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी  ) शरण गेलेल्या नेत्यांच्या पायातील चप्पल बनायचे की स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या शिरपेचातील तुरा बनायचा*  हे सर्वसामान्य जनतेने ठरवायचे आहे. एक नेता तर या गळाला अडकला आहे पण आणखी कितीही नेते या सत्ता, पैसा, पद यासाठी मनुवादी गळाला लागु द्या पण जनतेने मात्र कुठल्याही गळात अडकुन संविधान संपवणार्या शक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन देऊन बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संरक्षण संपवण्यात हातभार लावु नये. पवारांना सापडलेला नवा दास ओळखा व सावध रहा, त्यांच्याकडुन केला जाणार्या चुकीच्या व खोट्या प्रचाराला बळी पडुन मनुवादाची शक्ती वाढवु नका.
म्हणुनच मनुवाद्यांच्या या राजकीय गळाला कोण कोण अडकणार?  हा प्रश्न नकली पुरोगामी नेत्यांसाठी नसुन त्यांच्या पक्षात काम करणार्या कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेसाठी आहे.
नेते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोडी करतात त्यासाठी समाजाने स्वताला नकळत विकु नये हीच भावना आहे.
संविधान बचावो, देश बचावो.
- मनोज नागोराव काळे,ठाणे -  8169291009
______________________________________

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...