लोकशाहीची गुन्हेगार - भारतीय पेड मीडीया
- मनोज नागोराव काळे,ठाणे
भारत हे लोकशाही राष्ट्र आहे व मीडीया ( इलेक्ट्रॉनिक व पेपर)
हे या लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक म्हटले गेले. पत्रकार म्हणजे समाजात एक मानाचे स्थान समजले गेले. पण या देशातील राज्यकर्त्यांनी लोकशाही चा गैरवापर सुरु केला व त्या अनुशंगाने लोकशाही चा हा चौथा थांब राज्यकर्त्यांच्या पायरीचा धोंडा बनुन गेला, आजवर देशात गरीबी, बेरोजगारी, कामगार प्रश्न, स्त्रीयांच्या समस्या, देशाचा विकास, शेतकर्यांना हमीभाव, भ्रष्टाचार, धार्मिक ओढातान, दलित सामाजिक सर्वहारा समाजावरील अत्याचार हे मुद्दे प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट दिसले, याच मुद्यांवर सत्तर वर्षे सतत निवडणुका लढल्या गेल्या, पण निवडणुका या मुद्यांवर न जिंकता तेथे रग्गड पैशांचा, दारु मटन, ब्लेकमेलिंग किंवा धाक दडपशाहीचा वापर करुन जिंकल्या गेल्या.

सत्तर वर्षे तेच मुद्दे घेऊन व तेच ठराविक राजकीय पक्ष भारतीयांची सतत फसवणुक करत आले, या गोष्टी जनतेसमोर मांडणे व त्यात सुधारणा करण्यासाठी जन रेटा निर्माण करणे, दबावगट निर्माण करणे हे पत्रकार व मीडीयाचे आद्यकर्तव्य होते पन काही बोटावर मोजण्याइतके पत्रकार वगळता बाकी सर्व पत्रकार हे राजकीय पक्षांचे मीडीयातील दलाल बनले व त्यांच्या पक्षांचा प्रचार व विरोधकांना बदनाम करण्यासाठी न्युज चैनल्स व वर्तमानपत्रे काम करु लागली, लोकशाही चा खांब लोकशाहीचा दलाल बनला, त्यामुळेच आज लोकशाही हुकुमशहांच्या हातचे बाहुले बनली आहे, आज लोकशाहीच्या नावाने देशात अघोषित हिटलरशाही राबवली जात आहे यात पेड मीडीया चा सिंहाचा वाटा आहे. *जो पत्रकार लोकशाहीचा कार्यकर्ता असायला पाहीजे होता तो एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता बनुन गेला*.
जनता ही वर्तमान पत्रांवर आणि टिव्ही न्युजवर विश्वास ठेवते, खेड्यापाड्यातील लोकांना दिवसभर काम करुन घरी आल्यास त्यांना न्युजवर जे दिसते त्यानुसार त्याचा मेंदु स्वताचे मत बनवतो, बहुतेक लोकांना त्यांच्या रोजी रोटीच्या मागे धावताना देशाता काय उलथापलथी होत आहेत याकडे लक्ष देता येत नाही, ते फक्त एखादे वर्तमानपत्र किंवा एखादा टिवी न्युज शो पाहुन माहीती घेतो, मात्र त्याला मिळत असलेली माहीती कितपत खरी आहे, कितपत या देशाच्या हिताची आहे याचा विचारच तो करत नाही व चुकीची, खोटी माहीती देशवासीयांपर्यंत पोचवण्याचे काम मीडीया नित्य नियमाने करताना दिसत आहे.
या देशाला संकटात टाकण्याचे काम मीडीयाच करत आहे,
नोटबंदी, जिएसटी,गोरक्षकांची दादागीरी, आधार कार्ड मागचा जहरी कांड हे सर्व गोष्टी मीडीया ने जाणिवपुर्वक लपवल्या ज्याचा परिणाम देशाच्या आर्थिक अधोगतीत झाला, मीडीयाने देशाला खड्यात घालणार्या योजना व सरकारी निर्णयांचा विरोध न करता त्या निर्णयांची वकीलीच केली. आज भारत देश विकसनशील देशांच्या यादीतुन बाहेर फेकला गेला ही शरमेची गोष्ट आहे. जर आज सोशल मीडीया नसता व सोशल मीडीयावर जागृत व राष्ट्रप्रेमी लोक लिहीत नसते तर आजवर या सरकार ने हा देश विकुन टाकला असता.

या देशात भाजप सरकारने गोवंश बंदी चा कायदा केला गेला त्याचे कारण देशात गोमांस खाने बंद झाले तर ते गोमांस विदेशात निर्यात करुण त्यातुन पैसा कमावने हाच एक त्यामागचा हेतु होता, भारत हा देश गोमांस निर्यातीत जगात अव्वल बनला, जर यांना गोहत्या पाप वाटत असती तर त्यांनी कापुन निर्यात केली असती का? कापुन निर्यात केलेले चालते पन देशात खाऊ दिले जात नाही यामागचे कारण वरती सांगितलेच आहे.
हे मुद्दे कोणता मीडीया किंवा पत्रकार कधी समोर येऊन मांडताना आपल्याला दिसला का?
हे मुद्दे कोणता मीडीया किंवा पत्रकार कधी समोर येऊन मांडताना आपल्याला दिसला का?
★ हिटलरशाही भाजप शासनात त्यांच्या विरुद्ध लिहीणारे व बोलणारे मोजके पत्रकार यांना आयकर विभाग, सिबीआय यांच्यातर्फे दबाव आणुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यातुनही जे लोकशाही बद्दल आग्रहीच राहीले त्यांना नोकरीवरुन काढुन टाकले गेले.
★ नालासोपारा येथे सनातन संस्थेच्या काही धर्मांध साधकांना बॉम्ब व इतर स्फोटक व हत्यारांसह पकडले गेले पन ही बातमी लपवण्यासाठी पापी मीडीयाने मानवाधिकार कार्यकर्त हे माओवादी आहेत यावर चर्चा करायला सुरुवात केली. पोलिसांनी सादर केलेले नकली पत्र व त्यातील मजकुरावर बारा दिवस सतत चर्चा केली गेली. कोर्टाने ताषेरे ओढे पर्यंत.
★१ जानेवारी ला कोरेगाव भीमा येथे जातीयवादी भीडे समर्थकांनी आलुतेदार बलुतेदारांवर लाठ्या काठ्या व दगडांनी हल्ला केला, गाड्या जाळल्या पन मीडीया ने त्या घटनेला दोन गटातीस संघर्ष असे दाखवन्याचा प्रयत्न केला व त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणुन जो बंद पुकारला गेला त्या बंद करमारांना, न्याय मागमारांना नक्सली ठरवण्याचा प्रयत्न मिडीया कडुन केला गेला.
★ जगातील सर्व मान्यवर अर्थतज्ज्ञांनी नोटबंदीचे दुष्परीनाम मांडले पन मीडीयाने काही चित्रपट अभिनेते व साधु भोंदुच्या नोटबंदीच्या समर्थनाच्या मुलाखती दाखवुन जनतेला मुर्ख बनवले.
★ कन्हैया कुमार वर देशविरोधी घोषना दिलेला व्हिडीयो टैम्पर्ड म्हणजे नकली होता हे कोर्टाने सांगीतले असुनही मीडीया व पत्रकार सतत त्याने घोषना दिल्या हे सांगुन कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करत असतात.
★ दिल्ली येथे काही लोकांनी जाहीरपने संविधानाची प्रत जाळली मात्र मीडीयाने या घटनेकडे दुर्लक्षच केले, ज्या देशाचे नागरिक व ज्या संविधानाचे हे चौथे खांब समजले जातात त्या संविधानाला जाळल्याची बातमी लपवली गेली.
★ सैनिकांच्या अनेक प्रश्नांवर मीडीया गप्प का? सिमेवरील सैनिकांचे ज्वलंत प्रश्नही मीडीया कधी सरकार कडे लावुन धरत नाही.
★ हिंदु मुस्लिम चर्चा सतत प्राईम टाईम मध्ये रंगवल्या जातात कारण जेव्हा लोकांच्या डोक्यात हा हिंदु मुस्लिम वाद घुसतो तेव्हा तो दर्शक स्वताचे बेरोजगारी, शिक्षण, महागाई या सर्व समस्या विसरुन जातो, धर्माची नशा सर्व विसरायला भाग पाडते.
★EVM मशीन मधे फेरफार करुन लोकांचा मत अधिकाराशी जो खेळ केला जातोय त्यावर मीडीया कधीही आग्रही दिसत नाही, निवडणुक प्रक्रीया ही लोकशाहीची महत्वाची प्रक्रीया आहे पन मीडीया याचा कधीही पाठपुरावा करताना दिसत नाही.
मीडीया ने जनतेचा प्रश्न घेऊन पत्रकारीता केली आहे असे दिसतच नाही, उलट राजकीय दलाली करणे हेच काम केले जात आहे.
मीडीया ने जनतेचा प्रश्न घेऊन पत्रकारीता केली आहे असे दिसतच नाही, उलट राजकीय दलाली करणे हेच काम केले जात आहे.
★सकाळी सहा पासुन लोकांना अंधश्रद्ध बनवुन साडे तीन टक्के वाल्यांसाठी ग्राहक निर्माण करण्याचे काम सर्वच टिवी चैनल करत आबेत. त्यासाठी तंत्र, मंत्र, ज्योतीष हे थोतांड लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे.
महाराष्ट्र या प्रत्येक क्रांतीची सुरुवात करणारे राज्य आणि यावेलीही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन माजलेल्या मनुवादाला वेसन घालण्यासाठी महाराष्ट्रच पुढे आला आहे.भाजप व आर एस एस ने संविधान संपवुन मनुस्मृती वर चालनारे राज्य तयार करण्याचे जाहीरपने बोलुनही मीडीया शांतच आहे, उत्तर प्रदेशात बिनधास्त मनु कोर्ट सुरु केले गेले आहे त्यावर मीडीया शांत आहे.
*मीडीया या देशाची दुश्मन आहे*, लोकांच्या डोक्यात देशाला संपवायला निघालेल्या लोकांबद्दल काहीही जागृती न करता उलट त्या लोकांचे दैवतीकरन केले जात आहे, देशाला हुकुमशाहीत ढकलणारांच्या दिवसभर आरती गायली जात आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या हुकुमशाही विरुद्ध निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी जनतेचे सर्व प्रश्न व मीडीयाने जे केले नाही ते लोकजागृतीचे काम करायला सज्ज आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे कार्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिव धोक्यात टाकुन करताना दिसत आहेत, लोकशाही वाचली पाहीजे व संविधान टिकले पाहीजे, लागु झाले पाहीजे याचा अग्रह धरला जात आहे. मात्र या *वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध हीच पेड मीडीया सरसावली आहे*, वंचित बहुजन आघाडी बद्दल जनतेचे मन कुलषीत करण्याचे काम सुरु झाले आहे,
मीडीयाच्या मालकांच्या मनातील मुस्लिम द्वेश, दलितांवरचा रोष, धनगर, भटके विमुक्त, ओबीसी समाजा बद्दलचा तिरस्कार व्यक्त होताना दिसतो आहे.
मीडीयाच्या मालकांच्या मनातील मुस्लिम द्वेश, दलितांवरचा रोष, धनगर, भटके विमुक्त, ओबीसी समाजा बद्दलचा तिरस्कार व्यक्त होताना दिसतो आहे.
आपन मीडीया ला त्यांची दलाली करण्यापासुन रोखु शकत नसलो तरी त्यांचे पाप जनतेसमोर सतत मांडत राहुन त्यांना निष्क्रीय केले पाहीजे, मीडीया हा प्रत्येक भारतीयाचा शत्रु बनली आहे हे सतत मांडले पाहीजे. लोकप्रबोधन व सोशल मीडीयाला आपन शस्त्रा सारखे वापरले पाहीजे.
फक्त १० वर्ष भारतीय संविधानाला पुर्णतः लागु केले गेले तरी हा देश महासत्ता बनु शकतो, पन चार वर्षच या देशाला मनुस्मृती नुसार लागु करण्याचे काही थोडे प्रयत्न केले तरी हा देश विकसनशील देशांच्या यादीतुन अविकसीत देशांच्या रांगेत पोचला, हजारो वर्ष भारत भुका कंगाल व अविकसीत रहाण्यामागे हेच मनुवाद हेच कारण आहे, यापुर्वीही *सम्राट अशोकाने लोकशाही राबवली होती तेव्हा भारत हा महासत्ता होता, तेव्हाच हा देश सोने की चिडीया समजला जात होता, या देशात मनुस्मृती लागु केली गेली व हा देश परकीयांच्या ताब्यात गेला,* बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर पुन्हा या राष्ट्राला लोकशाही दिली व सम्राट अशोकाचे चिन्ह हे राजमुद्रा केले पन सत्ता नेहमी मनुवादी विचारांच्या ताब्यात राहील्याने देशात संविधान पुर्णतः लागु केले गेले नाही, आता तर ते संपविण्याचा विडाच उचलला गेला आहे, यावर मीडीयाने कधीही आवाज उठवुन जनजागृती केलेली नाही ( अपवाद )
म्हणुन जर या देशात हुकुमशाही आली किंवा हा देश परकीयांच्या ताब्यात गेला तर त्याचा मोठा वाटा पेड मीडीयाचा असेल.
म्हणुन जर या देशात हुकुमशाही आली किंवा हा देश परकीयांच्या ताब्यात गेला तर त्याचा मोठा वाटा पेड मीडीयाचा असेल.
जर स्तंभच निखळले तर त्यावर उभी लोकशाही सुद्धा डळमळीत होणारच आहे. आपन सर्वांनी स्वतःला मीडीया समजुन सोशल मीडीयावर जमेल तेवढे, जमेल तशा शब्दांमध्ये लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी प्रबोधन करत राहीले पाहीजे, सोबतच प्रत्येक माणसाला व्यक्तीगत हे सर्व मीडीया व लोकशाही संबंध सांगत राहीले पाहीजे, पेड मीडीया ला निश्क्रीय करुन आपन लोकशाही ला तारु शकतो, पन प्रयत्न सर्वांनी करावे लागतील.
*आपल्या घरी येणारे वर्तमानपत्र व आपल्या घरात असलेला टिव्ही हा आरएसएस किंवा भाजपाचा कार्यकर्ता आहे* हे लक्षात ठेवा, त्यावर भाळुन आपले राजकीय निर्णय घेणे किती आत्मघातकी असते हे आपन २०१४ च्या निवडणुकांत पाहीले आहे, तरी यापुढे आपन पेड मीडीया पेक्षा स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीवर विश्वास ठेवुन स्वताचे राजकीय निर्णय स्वताच्या तर्काने घ्यावेत.
सत्तर वर्ष फसवणुक करणार्या कॉंग्रेस भाजपाच्या गळाल परत एकदा लागायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
सत्तर वर्ष फसवणुक करणार्या कॉंग्रेस भाजपाच्या गळाल परत एकदा लागायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तात्पर्य - मीडीया हे देशाला व नागरिकांना परत गुलामीत घालवण्यासाठी वापरली जाणारी सर्वात मोठी यंत्रणा आहे, त्यापासुन सावध रहावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
8169291009
8169291009
No comments:
Post a Comment