Sunday, 16 December 2018

संसदिय लोकशाही व जनतेने जोपासलेला गाढवाचा गुणधर्म.

संसदिय लोकशाही व जनतेने जोपासलेला गाढवाचा गुणधर्म.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताक राष्ट्रांपैकी एक, त्यातही वैविध्यपुर्ण भाषा, संस्कृती, प्रथा, परंपरा, इतिहास, भुगोल असे सर्व काही असुनही आपन गेली सत्तर वर्ष एकत्र नांदतोय, आपन एकसंघ राष्ट्र म्हणुन टिकु शकलो याला सर्वात मोठे कारण आहे आपले संविधान, भारतीय संविधानाचे हे सर्वात मोठे यश आहे असे म्हणायला हरकत नाही.
पण भारतीय संविधानाचा उद्येश्य फक्त देशाला एकसंघ ठेवने इतकाच नव्हता तर या देशातील प्रत्येक नागरिकाला उन्नती करुन समान संधी समान दर्जा मिळावा असा तो व्यापक अर्थाने होता.
आपनास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय समता दिली, *"एक व्यक्ती एक मत, एक मत एक मुल्य"* हा अत्यंत क्रांतीकारी निर्णय या भारत देशात लागु करुन घेण्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना यश आले.
तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की *आजपर्यंत या देशाचा राजा राणीच्या पोटातुन जन्म घ्यायचा पन मी अशी व्यवस्था केली आहे की यापुढे या देशाचा राजा मताच्या पेटीतुन जन्म घेईल"*
या देशाच्या राजाचे पालकत्व, पितृत्व, मातृत्व म्हणा किंवा निर्माण करण्याचा अधिकार म्हणा तो पुर्णपणे भारतीय जनतेच्या हाती सोपवला गेला, तुम्हीच तुमचे प्रतिनिधी निवडा, तुमचे प्रश्न तुमचे प्रतिनिधी सोडवतील. पन भारतातील जनता या अधिकाराला समजुच शकली नाही, भारतीयांमध्ये मताधिकार हा आपला अधिकार आहे ही भावनाच रुजु दिली गेली नाही,त्याला दानाचे रुप दिले गेले, आणि पर्वीपासुन रितच आहे की *दान हे बामनालाच केले पाहीजे, व आपन ते मताचे दानही बामन व बामनवादी लोकांना फुकट देत आलो, आपल्या सर्वात मोठ्या अधिकाराला आपन एक वेळच्या दारु,मटनासाठी गहान टाकु लागलो, आपल्या पोटात गेलेल्या दारुचे व मटनाचे एक दिवसात काय होते? आपल्या मलमुत्रात त्याचे रुपांतर होते. म्हणजे *आपन आपल्या सर्वात मोठ्या अधिकाराला मलमुत्रात बुडवुन मोकळे झालो*, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. आपन मत पेटीतुन राजा निर्माण न करता पुन्हा काही घराण्यातच ( महाराष्ट्रातील १६९ घराने  ) राजे निर्माण करत गेलो, लोकशाहीतुन आपन हुकुमशाही ला जन्म देत गेलो, घरानेशाही ला जन्म देत गेलो ही बाब चिंतनीय आहे. विचार करुन पहा की
आपनच निवडुन दिलेल्या प्रतिनिधी विरुद्धच आपन पाच वर्ष मोर्चे, आंदोलने, निदर्षने का करावे लागतात? *आपला प्रतिनिधी सक्षम नसेल तर त्याला पुढच्या वेळी कसे काय निवडुन दिले जाते*? सतत सत्तर वर्षे आपन ही चुक कसे काय करु शकतो?
सत्तर वर्षात या देशावर फक्त ब्राह्मणवादी लोकच आलटुन पालटुन कसे काय राज्य करु शकले? कॉंग्रेस व भाजपा यात जो सत्तेवर असतो तो आपल्याला फुंकुन फुंकुन लुबाडुन खातो व दुसरा त्यांचा विरोध करण्याचे ढोंग अत्यंत चलाखीने करतो, पुन्हा सत्ता पालट होतो व दुसरा पक्ष जनतेला लुबाडुन खातो व विरोधी बाकावर बसलेला मात्र त्यावेळी जनतेच्या हक्काचे ढोंग करुन पाच वर्ष काढतो, असे सतत आपन कॉंग्रेस व भाजपाला आपल्याला लुटायला आपनच आलटुन पालटुन निवडुन सत्तेवर बसवत आलोय, यात कॉंग्रेस व भाजपाची काहीही चुक नाही, त्यांना मतदान करणारा वर्ग हा गाढव आहे, मतदाराला भानच नाही की आपन मत देतो म्हणुन हे भ्रष्ट भामटे आमदार,खासदार,मंत्री बनत असतात, एकदा दुधाचा चटका लागला तर ताकही फुंकुन पितात असे बोलले जाते पन इथे सलग सत्तर वर्ष लुटले गेले, लुबाडले गेले, नागवले गेले, सत्तेचा माज दाखवुन अन्याय अत्याचार केले तरी आपन परत परत त्याच लोकांना आपन स्वतःच निवडुन देत असु तर त्याचे खरे गुन्हेगार आपनच आहोत, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेची किल्ली म्हणजे मताधिकार आपल्याला दिला असताना आपन ती किल्ली चोराच्या हातात देतो व त्याने चोरी केली की आपनच रस्त्यावर मोर्चे आंदोलने करतो, हा किती मुर्खपनाचा कळस आहे म्हणावे लागेल.
बाबासाहेबांनी एके ठिकानी म्हटले आहे कि " *सातत्य हा गाढवाचा गुणधर्म आहे*" खरोखर आपन आपल्याच हितशत्रुंना सतत सत्तर वर्षे निवडुन देऊन आपल्या गाढवपनाचे प्रमाणच दिले आहे.
दुसरा गाढवपना म्हणजे "जातीसाठी माती खाने"
उमेदवार कोणत्या विचारधारेच्या पक्षातुन उभा आहे, तो पक्ष आपल्या अस्तित्वार तर उठलेला नाही ना, तो पक्ष माझे शिक्षण, रोजगार, महागाई, दैनंदिन सुविधा व माझी सुरक्षा याबाबत जागृत आहे का?  या सर्व गोष्टी न पाहता *आपल्या जातीचा उमेदवार असेल तर त्याला डोळे मिटुन मत टाकायची आत्मघातकी सवय भारतीयांना जडलेली आहे*, याच दोन सवयींमुळे आज आपला देश गाढवांच्या हातात गेली आहे, जैसी प्रजा वैसा राजा किंवा जैसा राजा वैसी प्रजा.
या सर्व उलथापलथीच्या राजकीय घडामोडी होत असताना, महाराष्ट्रातुन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली गेली आहे, लोकशाही ज्या वर्गांपर्यंत आजवर झिरपलेली नाही,  ज्या समुदाय,समाजाचा सत्तर वर्षात कॉंग्रेस व भाजपा व त्यांच्या समविचारी पक्षांनी कधीही सत्तेत सहभागी करुन घेतलेले नाही, ज्या समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही, प्रतिनिधीच नसल्याने त्यांच्या कोणत्याच प्रश्नांची कधी चर्चा होऊ शकली नाही, मराठा समाजाची परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राची सत्ता सतत मराठा समाजाकडे आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजाच्या एका गटाकडेच ती सत्ता आहे त्यांनी मराठा समाजाचा फक्त वापर करुन घेतला व स्वता *शिक्षसम्राट, साखर सम्राट, सहकार सम्राट, कारखानदार,जमीनदार* होऊन बसले, मराठा तरुण यावेळी जागृत होऊन या मराठा नेत्यांना आता फैलावर घेत आहे,प्रश्न विचारु लागले आहेत ,मराठा क्रांती मोर्चात ती भावना व्यक्त केली आहे, अशांनी एकत्र येऊन आता सत्ता संपादन करुन स्वताचे प्रश्न सोडवुन घेण्याचा अत्यंत प्रशंसनीय, अत्यावश्यक निर्णय घेतला आहे,
चाळीस वर्ष ज्यांनी निश्कलंक राहुन चळवळीचे कार्य सुरु ठेवले होते अशा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे या आघाडी चे नेतृत्व आहे. आता मात्र भारतीय मतदारांनी आपला गाढवपनाची सवय मोडुन मतदार हा सत्तेचा मायबाप असतो हे सिद्ध करण्यासाठी सज्ज रहायला पाहीजे. आपल्याला एक विद्वान,  निर्भिड, मुत्सदी नेतृत्व मिळाले आहे त्याचा उपयोग करुन घेतलाच पाहीजे.
मराठा समाजातील तरुणांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी अवाहन केले आहे की तुम्ही आता तुमच्या अधोगतीस तुमचेच आपसातील नेते जबाबदार आहेत हे ओळखले आहे तर आता मराठा तरुणांनी स्वता राजकारणात उतरुन या जुन्या प्रस्थापितांना बाजुला सारुन स्वतः सत्ता मिळवावी.
संपुर्ण भारतालाच संविधान,नागिरक व नागरिकांच्या अधिकाराबद्दल जागृत केल्या बद्दल मी बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो, आता *लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, शिवशाही विरुद्ध पेशवाई, शिव फुले शाहु आंबेडकर  विरुद्ध मनुवादी ,भारत विरुद्ध हिंदुस्थान* असा समोरासमोरचा संघर्ष होत आहे, प्रत्येकाने आता निर्णय घेऊन कोणत्याही एका बाजुला उभे रहायची वेळ आली आहे, आता तटस्थ रहाणे भारत देशाला परवडणारे नाही.
चल ऊठ उगार मुठ
भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.
- मनोज नागोराव काळे, 8169291009

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...