Sunday, 16 December 2018

२. या भयभितपनाला राजकारण म्हणता येईल का?

या भयभीतपणाला राजकारण तर म्हणता यायचेच नाही?

मुंबई मंथन - मोदी यानंर पंतप्रधान राहणार नाहीत ( शरद पवार  )

काल - अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते - (रावसाहेब दानवे)

आज - मोदी आणखी पाच वर्ष पंतप्रधान राहीले पाहीजेत - ( शरद पवार)

राजकारणात एखाद्याचा रामदास होणे यालाच तर म्हणत नसतील ना? पोलीस कारवाई च्या धाकामुळेच युती व आघाड्यांचे गणिते जुळवुन आणली जात आहेत, हे लोकशाही साठी अतिषय घातक आहे.

असे दगडाखाली हात असणारांना निवडूण देऊन जनतेचे किती हित असणार आहे हे मतदारांनी स्वतः विचार करावा. व यापुुढे देशाचे नेतृत्व सर्वात स्वच्छ चारित्र्य, भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला, निर्भिड, व जनतेचे मुळ व मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारा नेता निवडावा.भाजप कॉंग्रेस च्या कुबड्यांवर स्थिरावलेल्या बुजगावण्यांच्या हाती सत्ता दिली तर प्रजासत्ताक भारताचा सत्यानाश अटळ आहे.

निर्भिड, निश्कलंक व भाजपा ज्याला कोणत्याही दबावात आणु शकत नाही असे नेतृत्व स्विकारुन देशाला वाचवावे.

- मनोज काळे, ठाणे.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...