Sunday, 16 December 2018

दै.सम्राट व लॉर्ड बुद्धा टिव्ही ला समाजाचा धाक का वाटत नाही?

दै.सम्राट व लॉर्ड बुद्धा टिव्ही ला समाजाचा धाक का वाटत नाही?
- मनोज काळे.
आंबेडकरी जनता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर जिवापाड प्रेम करते, जन्मदात्या आई बापापेक्षा बाबासाहेबांबद्दल समाजात जास्त आस्था आहे व याच आस्थेचे भांडवल करुन काही लोक श्रीमंत होतात, प्रसिद्धी मिळवतात व नंतर पध्दतशीर वैचारिक शत्रुला शरन जाऊन आणखी मलाई मिळवतात, याचे ताजे उदाहरणे घ्यायची असतील तर दैनिक सम्राट, व लॉर्ड बुद्धा टिव्ही ही आहेत.
(दै. महानायक ला मी आंबेडकरी पेपर मानतच नाही कारण हा पेपर सतत भुमिका बदलत असतो व हवा येईल तशा बातम्या करत असतो याचा संपादक आंबेडकर कुटुंबाचा सतत पुर्वग्रहाने  द्वेश करत असतो)
आपन मोदी व भाजपाने मीडीया विकत घेतली त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही किंवा आपल्या महत्वाच्या बातम्या दाखवल्या जात नाहीत, छापल्या जात नाहीत म्हणुन सतत मीडीयावर टिका करत असतो मात्र जे वर्तमानपत्रे व टिव्ही चैनल आंबेडकरी जनतेने घरातील कष्टाचा एक एक रुपया देऊन पोसला आहे ते सुद्धा आता समाजाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. सम्राट पेपर साठी तर लहान मुलांनी खाऊचा पैसा सुद्धा दान केला होता, सम्राट ची भरभराट आम्ही स्वता पाहीली आहे.
आद.लक्ष्मण माने साहेबांच्या धर्मांतर सोहळ्याला सतत जनतेपर्यंत पोचवुन तो कार्यक्रम यशस्वी करण्यात दै.सम्राट ची महत्वाची भुमिका होती त्याबद्दल त्यांचे कौतुक झाले होते व आज तेच आद.लक्ष्मण माने साहेब पायाला भिंगरी लावुन मनुवाद गाडण्यासाठी राज्यभर फिरत आहेत तेव्हा मात्र दै.सम्राट त्यांच्या बातम्या देणे टाळत आहे, कशामुळे हा भेदभाव?
तो भेदभाव मला वैयक्तिक तरी असा दिसत आहे की त्यावेळी माने साहेब शरद पवारांसोबत होते व आज ते स्वाभिमीनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहेत.
काल सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे पहिले आरक्षण महाअधिवेशन लाखो वंचितांच्या साक्षिने पार पडले, भारताच्या इतिहासातील अत्यंत लक्षणिय व महत्वाची घटना, सर्व जातीची वंचित लोक एका नेतृत्वात एकवटलेले दिसले मात्र दै.सम्राट पेपर ने यावेळी या भव्य सभेची साधी दखलही घेतलेली दिसली नाही पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या बातमीला हेडलाईन मध्ये छापले गेले. सम्राट व संपादकाला या आघाडीची भुमिका पटत नाही असे मानले तरीही त्या बातमीला त्यांना वाटते त्या दृष्टीकोनातुन छापायला पाहीजे होते, पुर्णपने दुर्लक्ष करने हे बबन कांबळेच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह (?) उभे करते.
शरद पवारांच्या पैशावर हा पेपर चालतो का? असाच जनतेतुन प्रश्न विचारला जात आहे, सोशल मीडीयावर आज सम्राट व लॉर्ड बुद्धा टिवी कडे समाज हक्काने जाब विचारताना दिसत आहे. हे होणे गरजेचे होते,  कारण माने साहेब पवाराकडे होते तेव्हा त्यांच्या बातम्यांना रोज दोन दोन पाने दिली जायची व तेच माने साहेब स्वाभिमानाने आंबेडकरांकडे येऊन वंचितांची एकजुट घडवुन आणुन सत्ता परिवर्तन करुन शरद पवाराच्या राजकारणाला सुरुंग लावत आहेत हे बबन कांबळेंना पहावत नसावे? असाच तरुणाईचा एकंदरीत सुर उमटत आहे.
आज सम्राट ने जे केले त्याबद्दल सम्राट चा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे. समाजाच्या जिवावर जगणार्याने समाजाशी गद्दारी करु नये. सम्राट ने लोकसभा, विधानसभा, व पनवेल भिवंडी निवडणुकांच्या काळातही भाजप च्या मुखपत्राची भुमिका बजावलेली आपन पाहीली आहेच. समाजाने या प्रवृत्तींना पोसने सोडले पाहीजे, आपल्या घरात आपन भाजप व कास्टवादी चे पेपर घेने बंद केले पाहीजेत.
लॉर्ड बुद्धा टिवीच्या स्टेजवर तर गडकरी व बडोले साहेब जितक्या वेळा दिसतात तेवढे कोणतेच आंबेडकरी नेते दिसत नाहीत, किती वर्षापासुन फंड गोळा करत आहेत हे आपन सगळे जाणतोच आहोत, इतके वर्ष पैसा गोळा करुन त्याचे काय केले?
ज्या समाजासाठी तो चैनल चालवला जातो त्याच समाजाच्या नेत्यांना चैनलवर काहीही स्थान दिले जात नाही मात्र जिथे जिथे लॉर्ड बुद्धा चे कार्यक्रम असतील तेथील स्थानिक भाजप प्रतिनिधी टिवीवर चमकतात व त्यांचे विचार मांडतात, मी तर दोन वर्षा पासुन तो चैनलच पहाने बंद केले आहे, भाजपचा कार्यकर्ताच वाटला मला हा चैनल.मी वंचित बहुजन आघाडी सोलापनर अदिवेशनापुर्वी  एक दिवस आगोदर या चैनल ला फोन करुन विचारना केली होती की तुम्ही कार्यक्रम लाईव्ह करणार आहात का?. त्यांनी थेट नकार दिला व सांगितले की परवानगी मिळत नाही व ज्यांनी कार्यक्रम लावला त्यांनी दिल्लीवरुन परवानगी आणायची असते, यांच्याशी वाद न घालता आपन आपला सोशल मिडीया मजबुत करणे हाच यावर उपाय आहे हे लक्षात आले.
प्रश्न हा आहे की यांना समाजाने यापुढे का पोसायचे? यांच्याकडुन जर आंबेडकरी राजकारणातील सर्वात उच्च उपलब्धी असणारे वंचित बहुजन आघाडी बद्दल भेदभाव केला जात असेल तर अशा बांडगुळांना आपले रक्त आटवुन कमावलेल्या पैशावर पोसने सोडावे. यांचे पेपर व टिवी वर बहिष्कार टाकावा. यांचे गॉडफादर करतील त्यांना मदत पन आपन आपला शत्रु पोसु नये.
लोकशाही तळागाळातील वंचितांपर्यंत पोचवन्यासाठी लोकशाहीचा खांबच मदत करत नसेल तर त्यांना पोसने घातक आहे.
सोशल मीडीयावरुन आपन आपल्या कार्यक्रमांना लाईव्ह करावे, सोशल मीडीयावर आपला प्रचार करावा.
इतकी उघड उघड समाजाशी बैइमानी करताना यांना हिम्मत येते कुठुन?  हा प्रश्न येतो. समाजाचा यांना धाक वाटत नाही ना यांना यांच्या निर्लज्ज कृत्याची लाजही वाटत नाही.
समाजाने या पेपर व टिव्ही वर बहिष्कार टाकुन यांना पर्याय सोशल मिडीया वर सतत आपले विचार प्रचार प्रसारित केले पाहीजेत.
- मनोज काळे, ठाणे 8169291009

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...