*मराठा समाजासाठी इतिहासाची व संधीची पुनरावृत्ती.*
- मनोज नागोराव काळे, ठाणे
मराठा क्रांती मोर्चे निघत होते तेव्हा काही लोक त्यांना विरोध करण्याच्या पावित्र्यात असताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अवाहन केले की हे मोर्चे कोणत्याही समाजा विरुद्ध नसुन सरकार विरुद्ध आहेत व त्या विरुद्ध कुणीही प्रतिमोर्चे काढु नयेत, व महाराष्ट्रात होऊ घातलेला एक मोठा संघर्ष टाळला गेला व पुढे काही दिवसांनी महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या.
1. कोरेगाव भीमा येथे क्रांतीस्तंभाला वंदन करण्यासाठी आलुतेदार बलुतेदार जात असताना त्यांच्यावर हल्ला केला गेला.
गाड्यांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली व निसस्त्र, बेसावध लोकांवर हल्ला झाला.
गाड्यांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली व निसस्त्र, बेसावध लोकांवर हल्ला झाला.
2. शरद पवारांनी लगेच प्रतिक्रीया दिली की हा हल्ला हिंदुत्ववादी लोकांनी केला आहे.
3. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा हल्ला मनोहर भीडे व मिलींद एकबोटे या लोकांनी घडवुन आणल्याचे जाहीर केले.
4. मनोहर भीडे ला मोठे करण्यात शरद पवाराचा कसा हात आहे हे बाळासाहेब आंबेडकर यांनी मीडीया समोर जाहीर केले.
5. मराठा क्रांती मोर्चा व संभाजी ब्रीगेड च्या समन्वयकांनीही मनोहर भीडे चा विरोध केला व मनोहर भीडे विरुद्ध च्या एल्गार मार्च मध्ये सहभाग दाखवला.
6. *बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचित घटकांना एकत्र करुन वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती केली* व सर्वच वंचितांना सत्तेत सहभाग मिळु शकतो याची पहील्यांदा जाणीव करुन दिली व महाराष्ट्रात सत्ता संपादन मेळावे यशस्वी रित्या पार पाडले.
7. *धनगर,बंजारा,जैन, मातंग, विस्थापित मराठा, भटके विमुक्त, आदिवासी यांच्या जीवावर आजवर कॉंग्रेस,भाजप,राष्ट्रवादी सत्तेत रहात होती पन त्यांना कधीच सत्तेचा भागीदार केले जात नव्हते* म्हणुन सर्व वंचित समाज आशेने बाळासाहेबांच्या नेतृत्वात एकत्र आला.त्यांचा ओघ वाढतच आहे.
8. एमआयएम ही वंचित बहुजन आघाडीत सामिल झाला, मुस्लिम जनता बाळासाहेबांच्या नेतृत्वात राजकीय ताकद दाखवनार हे स्पष्ट झाले.
9. शरद पवारांनी लगेच मायावतीने महाराष्ट्रात येऊन दलितांचे राजकारण करावे कारण इकडे नेता नाही असा प्रयत्न केला.
10. बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की *आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसची वाट पाहु पन राष्ट्रवादी सोबत मात्र युती करणार नाही,* कारण पवारांच्या पक्षात मनोहर भीडे चे समर्थक आहेत.
11. कॉंग्रेस ने बाळासाहेबांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.
12. मराठा क्रांती मोर्चा ने राजकीय पक्ष स्थापन करण्याचे जाहीर केले.
13. पवारांनी उद्यनराजेंना घरी बोलावुन गुपित चर्चा केली. उद्यनराजेंनीही त्या बैठकीनंतर थोडी निगेटिव प्रतिक्रीया दिली.
14. मराठा क्रांती मोर्चा चा नविन पक्ष स्थापन होण्यापुर्वीच त्यात फुट पडल्याच्या बातम्या आल्या, एकाला वाटते की पक्ष नसावा, *एकाने जाहीर केले की पक्ष बनावा पन त्याचे नेतृत्व उद्यनराजे नी करावे.*
15. पवारांनी खोटे आरोप करायला सुरवात केली, गावंडे सारख्याला काही खोटी माहीती पसरवायला पुढे केले
16. पवारांनी मोदींचा राफेल शी संबंध नाही असे जाहीर केले.
आता पहा, पवारांनी कशी काय खेळी केली हे वरील क्रमवारी पाहुन समजु शकते.
आजवर राष्ट्रवादी पक्षाने ज्या लोकांना फक्त सत्तेवर पोचन्याची पायरी म्हणुन वापरले व फेकुन दिले ते सर्व आता स्वाभिमानी नेतृत्वात एकत्र आलेत.
*शरद पवार साहेब उद्यनराजेंना पक्षातुन काढणार की नाही माहीत नाही पन पवारांवर नाराज असलेल्या मराठ्यांचे उदयनराजे नी नेतृत्व केले पाहीजे असा काही सारिपाट लावला गेला आहे.*
पन मराठा क्रांती मोर्चा ही परत एकदा प्रस्थापित वर्गाच्या हाती नेतृत्व सोपवुन आजवर केलेल्या सर्व कष्टांवर, सर्व मुक मोर्चाच्या यशावर पाणी सोडणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.
*जातीसाठी माती खाऊन आज मातीत जायची वेळ आली* असताना तरी मराठा समाजातील तरुण, सुशिक्षीत, बुद्धीजीवी तरुणांनी जाती पेक्षा आपल्या भविष्याचा विचार करावा.
इतिहासाची व एका संधीची पुनरावृत्ती होताना दिसते आहे,
पन मागे जो चुकीची निर्णय इतिहासात घेतला तो बदलला तर समाजाचे भवितव्य बदलल्याशिवाय राहणार नाही.
पन मागे जो चुकीची निर्णय इतिहासात घेतला तो बदलला तर समाजाचे भवितव्य बदलल्याशिवाय राहणार नाही.
*एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षणाची संधी तत्कालीन गर्विष्ठ मराठा नेत्यांनी नाकारली होती व त्याचे परिणाम आज मराठा समाज एक वंचित घटक बनुन राहीला*, 168 मराठा कुटुंबानी स्वताचे गोदामे पैशांनी भरली, स्वतः सहकार सम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट बनले पन समाजाला मातीतच घालत आले.
*आज परत एक आंबेडकर मराठा समाजासाठी स्वताच्या जीवाला तळहातावर घेऊन याच साखरसम्राट, शिक्षण सम्राट, सहकार सम्राटांशी समोरा समोरची लढाई लढत आहेत,* आज जर मराठा समाजाने परत त्याच चुकीची पुनरावृत्ती केली तर मग कुणीही वाली राहणार नाही. आज बाळासाहेब आंबेडकर ज्या जिद्दीने लढत आहेत ते नवचेतना देणारे आहे.
*फक्त जातीसाठी माती खाऊन पुढच्या पिढ्यांना मातीत घालायचे आहे का?* कि एका प्रामाणिक विद्वान व सक्षम नेतृत्वासोबत राहुन आपल्या हक्कांना गवसनी घालायची आहे? हे ठरवावेच लागेल, संविधानाने दिलेले सर्व अधिकार मिळवुन आपल्या सर्व समाजाला, देशाला उन्नत करायचे असेल तर बाळासाहेब आंबेडकरांची ताकद बनने हाच पर्याय आहे.
मराठा क्रांती मोर्चा ही जगातील खुप मोठी क्रांती आहे पण ती क्रांती ज्या प्रस्थापितांच्या विरुद्ध होती त्यांच्यात हातात सुत्रे सोपवली तर "मराठा आंदोलक वंचित" समाजाच्या हाती फक्त निराशाच येईल याची मला खात्री आहे.
*नेत्याची जात न पाहता नेत्याची नियत पाहीली तर आपल्या देशाचा विकास खुप कमी दिवसात होईल,* आपन स्वता या क्रांतीत सहभागी होऊयात व मराठा क्रांती मोर्चा निर्माण करत असलेल्या राजकीय पक्षाची दोर चुकीच्या हातात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
8169291009
8169291009
No comments:
Post a Comment