आंबेडकरवादी समाजाने राजकीय साक्षर बनावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
"सर्वात बेकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. त्याला ऐकायचं नसतं, बोलायचं नसतं, त्याला राजकीय घटनांत सहभागी व्हायचं नसतं. त्याला जगण्याची किंमत कळत नाही, कळत नाही की डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाड्याच्या दिडक्या, जोड्यांची किंमत, औषधांचे पैसे सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं.
राजकीय निरक्षर इतका मद्दड असतो की त्याला आपण राजकारणाचा द्वेष करतो हे सांगताना फार अभिमान वाटतो आणि छाती फुगवून तो ते सांगत रहातो.
त्या बेअकल्याला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानामुळेच वेश्येला व्यवसाय करावा लागतो, एखादे मूल फेकून दिले जाते आणि जन्म होतो सर्वात घाणेरड्या चोरांचा- वाईट राजकारण्याचा... जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा भ्रष्ट चमचा म्हणूनच वावरत असतो."
-- बर्टोल्ट ब्रेख्श्ट
भारत हा प्रजासत्ताक देश आहे, आपन संसदीय लोकशाही स्विकारली आहे, आपन एक सर्वोत्तम संविधान स्विकारले आहे ज्यात भारतीय नागरिकांत जात, धर्म, लिंग असा कोणताही भेदवाव संपवुन सर्वांना समान केले आहे.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवुन कॉंग्रेसविरोधी वातावरन निर्माण केले गेले व EVM च्या सहाय्याने निवडणुका जिंकुन कॉंग्रेस चा पराजय केला गेला, सर्वांना वाटले की कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे परावभव झाला, पन नंतर हळुहळु इविएम मशीनचा महाघोटाळा उघडकीस येऊ लागला व त्याविरुद्ध जनभावना तयार होऊ लागली.
कॉंग्रेसला संपवुन देशाच्या सत्तेवर आरएसएस व मनुवादी लोक येऊन बसले, अगदी हिटलर स्टाईलमध्येच.
हिटलरही लोकशाही मार्गाने सत्तेवर आला व त्यातुनच त्याने स्वतःचा हुकुमशाहीला स्वरुप दिले, हिटलरकडे जसा एक अट्टल खोटारडा मंत्री होता "गोबेल्स" तसा मोदीजींना "अमित शहा" आहे.
दोघे मिळुन पोलिस, मीडीया, न्यायालये मैनेज करुन संसदिय लोकशाहीची पाळेमुळे खणुन काढण्याचे कारस्थान राजरोसपने सुुरु केले, आम्ही रोज एक कायदा बदलनार असे मोदींनी सुरवातीलाच सांगितले होते तसेच त्यांनी केले.
युजीसी बंद, नियोजन आयोग बंद, आरक्षणावर गदा, सैन्याच्या बजेटमध्येही काटछाट केली गेली.
राफेल घोटाळा, व्यापम घोटाळा ( या घोटाळ्याचे ५० पेक्षा अधिक साक्षिदारांची हत्या केली गेली) , एलइडी घोटाळा, जलयुक्त शिवाराचे गाजर, शेतकर्यांना हमी भाव देण्यास टाळाटाळ, नोटबंदी सारखा महाघोटाळा, व्यापार्यांचे कर्जमाफी, न्यायाधिशांची हत्या व काहींनी तुरुंगवास, सैन्याचे जेवनाचे हाल, गोरक्षकांडुन दहशतीचे वातावरन बनवले, मॉब लिंचींग सुरु जाले, प्रामाणिक पत्रकारांना टिवी चैनलवरुन हटवले जाऊ लागले,मोदीचे मन की बात ऐकने कंपलसरी केले गेले, आपन काय खावे, काय बोलावे, काय नेसावे यावर जबरदस्ती केली जाऊ लागली, इ. व अनेक मोठमोठे घोटाळे व महापाप केले गेले.

हे सर्व आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. आपन पाहुनही त्याकडे पाहीजे तेवढे गांभिर्याने घेत आहोत असे दिसत नाही. मनुवदी लोक सर्व यंत्रनांचा उपयोग करुन जनतेमध्ये संविधानाला बदनाम करण्याचे काम करत आहेत सोबतच मोदी ला अवतार रुप दिले जात आहे. ते लोक त्यांचे काम इमानइतबारे करत आहेत. मात्र आपन ज्यांचे या देशावर प्रेम आहे, ज्यांचे संविधानावर प्रेम आहे ते मात्र मनुवादी टिवी चैनल व त्यावरील केल्या जाणार्या खोटया प्रचाराला भुलले जात आहेत असे दिसते.
फक्त एकमेव आंबेडकरी समाज सोशल मीडीयावर किंवा मोर्चे निदर्षनात भाजप सरकार विरुद्ध व्यक्त होताना दिसतो आहे, वंचित बहुजन आघाडी नंतर बौद्धेतर समाजही सरकारच्या हिटलरशाही विरुद्ध आपला आवाज बुलंद करताना दिसत आहे ही खरोखर ऐतिहासिक बाब आहे. पन आंबेडकरी समाजात राजकीय निरक्षरता मोठ्या प्रमाणात दिसुन येते, राजकीय डावपेच समजुन घेण्यात हा जागृत असलेला समाज कमी पडताना दिसतो, राजकीय प्रगल्भतेची कमी तेव्हा तेव्हा जानवते जेव्हा जेव्हा एखादा हिंदु सण उत्सव येतो.
जेव्हा कधी हिंदुचा सण उत्सव येतो तेव्हा हाच जागृत आंबेडकरी समाज ( अपवाद ) अचानक भारतीय नागरिकाच्या भुमिकेतुन निघुन कट्टरवादी बनतो व तसाच कट्टरवादाने जाहीररित्या व्यक्तही होतो.याचे काही उदाहरने पुढे देत आहे.

१. कोणत्या सणाला एखाद्या आंबेडकरी पक्षाच्या कार्यकर्त्याने शुभेच्छा दिल्या की लगेच त्याला गद्दार म्हणुन त्याविरुद्ध रान पेटवले जाते.
२. एखादा लोकप्रतिनिधी मंदिरात गेला की त्यालाही गद्दाराचा ठप्पा मारुन मोकळे होतात.
३. कुणी एखाद्या समाज बांधवाच्या घरी धार्मिक पुजेला हजेरी लावली की त्याचा पोस्टमॉर्टमच केला जातो.
२. एखादा लोकप्रतिनिधी मंदिरात गेला की त्यालाही गद्दाराचा ठप्पा मारुन मोकळे होतात.
३. कुणी एखाद्या समाज बांधवाच्या घरी धार्मिक पुजेला हजेरी लावली की त्याचा पोस्टमॉर्टमच केला जातो.
वरील एखादी घटना घडली की त्यांना सरळ सरळ बाबासाहेबांशी गद्दारी केली असा थेट आरोप केला जातो, या आरोप करणारात मोठमोठे स्वयंघोषित विद्वानही असतात. जो बाबासाहेबांशी गद्दारी करतो त्याला वाळीत टाका असे बोलले जाते.
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची आठवन करुन दिली जाते,
सम्राट सारखे भाजप धार्जिन वृत्तपत्र रोज या २२ प्रतिज्ञा पहिल्या पानावर छापुन अशा कट्टरवाद्यांना आणखी जहाल कट्टरवादी बनवुन सोडते.
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची आठवन करुन दिली जाते,
सम्राट सारखे भाजप धार्जिन वृत्तपत्र रोज या २२ प्रतिज्ञा पहिल्या पानावर छापुन अशा कट्टरवाद्यांना आणखी जहाल कट्टरवादी बनवुन सोडते.
आता आपन यांची उलटतपासनी करुयात, ज्या धम्माचे हे ठेकेदार बनुन एखाद्याला वाळीत टाकायची भाषा बोलतात त्या तथागतांच्या धम्मात वाळीत टाकने हा प्रकार येतो का? हिंदु धर्माचा वाळीत टाकायचा नियम स्वताला कट्टर बौद्ध समजनारे लोक सर्रास वापरताना दिसतात.
बर, फक्त देवा बद्दल यांना २२ प्रतिज्ञा का आठवतात, त्या २२ प्रतिज्ञांमध्ये मी दारु पिनार नाही, मी खोट बोलनार नाही, मी व्याभिचार करनार नाही, मी चोरी करनार नाही हे पंचशीलही दिले आहेत, मी समता स्थापन करेल, मी अष्टांग मार्गाचे पालन करेल, मी दहा पारमिता चे पालन करेल या प्रतिज्ञाही दिल्या आहेत.
मग एखादा बौद्ध म्हणुन घेणारा व्यक्ती दारु पितो तेव्हा त्याला २२ प्रतिज्ञाची आठवन सामुहिकरित्या झुंडीत जाऊन का सांगितल्या जात नाहीत, उलट एकाने घरात गणपती बसवला तर त्याला ठोकायला दारु पिऊन लोक जातात. २२ प्रतिज्ञा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलेकौटुंबिक, वैयक्तिक संविधान आहे त्याचे पालन केले पाहीजे पन त्याची जबरदस्ती दुसर्यावर करने हे संविधानात बसत नाही, धम्मातही जबरदस्तीला काहीही स्थान नाही. मारुन किंवा वाळीत टाकुन बौद्ध धम्म वाढलेला नाही व वाढनारही नाही.
बोधिसत्व बाबासाहेब व स्वतः तथागत बुद्धांनीही कधी धम्म घ्याच असा अग्रह धरलेला नव्हता, ज्याला पटेल त्यांनीच तो घ्यावा कारण बौद्ध धम्म हा विद्वानांचा धम्म आहे असे सांगितले.
बोधिसत्व बाबासाहेब व स्वतः तथागत बुद्धांनीही कधी धम्म घ्याच असा अग्रह धरलेला नव्हता, ज्याला पटेल त्यांनीच तो घ्यावा कारण बौद्ध धम्म हा विद्वानांचा धम्म आहे असे सांगितले.
ज्यावेळी बाबासाहेब धम्माचा अभ्यास करुन धम्म दिक्षा घेत होते तेव्हा आपला बहुजन समाज पुर्णपने देवांच्या आहारी गेलेला होता, बाबासाहेबांनी कुणाला वाळीत टाकायची भाषा केली नव्हती, त्यांनी आपल्या समाजाच्या घरा घरातुन देव काढण्याऐवजी आपल्या समाजाच्या डोक्यातुन देव काढुन टाकला, आपनही लोकांचे धम्म मार्गाने प्रबोधन केले पाहीजे,आपल्या घरात त्यानुसार वागण्याचा कोटेकोर प्रयत्न करायला हवा पन राजकीय पक्षांना २२ प्रतिज्ञांचे पालन करावे हा हट्ट बालिशपनाचे द्योतक आहे, बाबासाहेबांनी भारतीय जनतेला जे खुले पत्र लिहीले व ज्यात संविधान राबवन्यासाठी भारतीय प्रजासत्ताक पक्ष म्हणजे रिपाई बद्दल मत लिहीले त्यात संविधानाची प्रस्तावनाच रिपाई चे उद्दिष्ट आहे असे लिहीले.
राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधीला धर्म नसावा, तो सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणारा असला पाहीजे. म्हणुन कोणत्या राजकीय पक्षाने हिंदु,मुस्लिम, जैन, सनांच्या शुभेच्छा देने गैर नाही, आपन कट्टरपंथी नाही तर आपन भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीचे नागरिक आहोत याचे भान ठेवावे, बाबासाहेब स्वता बोलायचे की मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय, त्यामुळे आपन बाबासाहेबांना सुद्धा राष्ट्रा पेक्षा मोठे समजायची चुक करु नये.
बाबासाहेबांनी दिलेले संविधान जर त्यांचेच अनुयायी पायदळी तुडवतील व वरुन संविधान बचोवो चे आंदोलनही करतील तर ते हास्यास्पद ठरेल.
बाबासाहेबांनी दिलेले संविधान जर त्यांचेच अनुयायी पायदळी तुडवतील व वरुन संविधान बचोवो चे आंदोलनही करतील तर ते हास्यास्पद ठरेल.
आज वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातुन खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असा सर्व वंचित समाजाचा एक विरोधी पक्षच तयार झाला आहे असे बोलायला हरकत नाही, या आघाडीत सर्व समाजाचे सर्व धर्माचे संविधान व लोकशाहीवर विश्वास असणारे लोक एकत्र आले आहेत, आपन धम्माला आपल्या घराच्या चौकटीच्या आत ठेवुन, जिवनात पंचशीलाचे पालन करुन या बहुजन वंचित आघाडीत येणार्या प्रत्येक समाजाचे स्वागत करावे.
कट्टरवादाला बौद्ध धम्मात कवडीचेही स्थान नाही पन बामसेफ सारख्या नकली, बोगस संघटनांनी जाणिवपुर्व बौद्धांमध्ये कट्टरवाद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आता आपन बाबासाहेबानी दिलेल्या प्रज्ञा ,शील, करुणेचा धम्माला बदनाम न करता आपले जीवन जगावे, मात्र आपन जेव्हा समाजात जातो तेव्हा मात्र भारतीय नागरिक म्हणुन भारतीय संविधाना नुसार वागावे तेथे धम्म घुसडण्याचा प्रयत्न करु नये. आपल्या नेत्याने सांगितलेल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ समजुन घेतला पाहीजे,
मागे लक्ष्मन माने साहेबांनी रेसकोर्स वर धम्मदिक्षेचा मोठा कार्यक्रम घेतला होता तेव्हा आपल्याला आठवत असेल की आर आर पाटील, विलासराव देशमुख त्या स्टेजवर हजर होते पन लगेच मराठा समाजाने त्यांच्यावर आगपाखड केली नाही, हे अत्यंत समजुन घेण्याचा मुद्दा आहे, त्या समाजाला माहीत आहे जरी हे धर्मांतर सोहळ्यात गेले तरी ते बौद्ध नाहीत, राजकीय डावपेच समजुन घेतला गेला, राजकीय छुपे अजेंडे समाज समजुन घेऊ शकला पाहीजे निदान कार्यकर्ते तरी नेत्याच्या एका शब्दावरुन वाक्य समजुन घेतील असे प्रगल्भ असले पाहीजेत.

आबेडकरवाद्यांमध्ये बामसेफ ने भरलेला कट्टरवाद हा भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे, आपन आपल्या घरात आपला धर्म पाळावा व बाहेर भारतीय नागरिक म्हणुन संविधामा नुसार जगावे, वागावे याचे भान राहीले तरी वंचित बहुजन आघाडीला मोठी मजल मारण्यात नक्कीच फायदा होईल.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण भारतीयांमध्ये एक नवचेतना जागवली आहे, सर्वांमधे एक उर्मी निर्माण झालेली आहे, त्या नवचेतनेला क्रांतीची मशाल बनवने आता कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, ज्यांना ज्यांना लोकशाही मध्ये काही स्थान मिळाले नाही ते सर्व सोबत आहेत, माझ्या वरतीही कोणी नाही माझ्या खालीही कुनी नाही, हम सब एक है ..या बाळासाहेबांच्या भुमिकेला घराघरात जाऊन सांगितले पाहीजे व पेड मीडीया ला आपन आपल्या तोंडी प्रचाराने मात दिली पाहीजे.

जय भिम जय बाळासाहेब.
जय संविधान
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009
No comments:
Post a Comment